spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ब्रम्हपुरी-आरमोरी महामार्गावर भीषण स्फोट; इथेनॉल कंपनीत लागली मोठी आग, परिसरात दहशत

ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याचा बोरगावजवळ असलेल्या रामदेव बाबा सालवंट इथेनॉल कंपनीत आज अचानक भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की झिलबोडी, बोरगाव आणि उदापूर गावांतील अनेक घरांची काचे फुटल्या. अचानक झालेल्या या हादऱ्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. कंपनीच्या परिसरात धुराचे लोट दिसत होते आजूबाजूच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

Popular Articles