spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माऊली समूहाने “पाऊल भजन” ह्या संगीत नृत्य सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले

– नृत्य सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

नागपूर :- सध्या सुरू असलेल्या खासदार महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या १२ नोव्हेंबर रोजी, हरिपाठ अणि पाउल भजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यातील माऊली समूहाने “पाऊल भजन” ह्या संगीत नृत्य सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकून घेतले. भक्ती, नृत्य आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून आणि मान्यवरांना भावविभोर केले. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन माधवी नादरखानी आणि प्राजक्ता लोणारे यांनी केले होते. त्यांनी व त्यांच्या समूहानी अतिशय सुंदर व समर्पक अभिनय, नृत्य आणि भावपूर्ण प्रस्तुतीद्वारे विठ्ठलभक्तीचा संदेश पोहोचवला. कार्यक्रमाची प्रस्तावना व निवेदन आर्या विघ्ने यांनी भावपूर्ण शब्दांत सादर केली ज्यामुळे कार्यक्रमाला एक आध्यात्मिक प्रारंभ लाभला. सादरीकरणात “गणेश वंदना”, “रखुमाई रखुमाई” आणि “विठू माऊली” यांसारख्या भक्तिगीतांवर सादर झालेल्या नृत्यांनी वातावरण भक्तिमय केले. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले.

Popular Articles