Related Posts

दीवाळीत कामठीच्या सुरक्षेसाठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल सरसावले

<p><strong>&&num;8211&semi; जुनी कामठी पोलीस व वाहतूक विभागाशी चर्चा&semi; बाजारपेठेत बॅरिकेडिंग&comma; गस्त आणि हुल्लडबाजांवर कारवाईची मागणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;- <&sol;strong>दीवाळी च्या सणादरम्यान कामठी शहरात नागरिकांना सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करता यावा&comma; यासाठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून शहरातील सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला&period; जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयजी दिघे व वाहतूक पोलीस निरीक्षक मनीष बंसोड यांच्याशी त्यांनी विविध सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा केली&period;<&sol;p>&NewLine;<p>दीवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठा व मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता&comma; या परिसरात बॅरिकेडिंग करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची सूचना नगराध्यक्ष अग्रवाल यांनी केली&period; तसेच भरधाव मोटारसायकल चालविणे&comma; महिलांवर शेरेबाजी करणे आणि छेडछाडीसारख्या प्रकारांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी पोलिसांचे लक्ष वेधले&period;<&sol;p>&NewLine;<p>सणासुदीच्या काळात महिला&comma; लहान मुले व कुटुंबीय मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत येत असतात&period; अशा वेळी कोणत्याही नागरिकाला असुरक्षितता किंवा त्रास जाणवू नये&comma; यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेऊन प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करावी&comma; अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी पोलीस निरीक्षक विजयजी दिघे व वाहतूक पोलीस निरीक्षक मनीष बंसोड यांनी नगराध्यक्षांनी मांडलेल्या सूचनांनुसार आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले&period; शहरात नियमित पोलीस गस्त&comma; वाहतूक नियंत्रण आणि हुल्लडबाजांवर निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून कामठी शहरातील नागरिकांना दीपावलीचा सण आनंदात&comma; निर्भयपणे आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करता यावा&comma; यासाठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी व्यक्त केलेल्या पुढाकाराचे नागरिकांमध्ये स्वागत होत आहे&period;<&sol;p>&NewLine;