spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज शहराच्या पाणीपुरवठा समस्या उपाययोजना बैठकीसाठी महापौर श्रीचंदजी तेजवानी यांना आ. रवी राणा यांच्याकडून निमंत्रण

अमरावती :- शहरातील पाणीपुरवठा समस्या व अमरावती तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, मालटेकडी जवळ, अमरावती येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महापौर श्रीचंदजी तेजवानी यांना आमदार रवी राणा यांच्या वतीने त्यांच्या शासकीय स्वीय सहाय्यक उमेश ढोणे यांनी निमंत्रण दिले आहे.

विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस अमरावती महानगरपालिका प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत अमरावती शहरातील पाणीपुरवठा समस्या तसेच तालुक्यातील पाणी टंचाईवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Popular Articles