इंदिरा भवनात सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन यांची भेट

0
4

– संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम आणि आगामी कार्ययोजनांवर सविस्तर विचारविनिमय

संदीप कांबळे,कामठी :- काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन यांची दिल्ली येथील इंदिरा भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व कामठी विधानसभा चे नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान संघटनात्मक कार्याला अधिक गतिमान करण्यासह सामाजिक उपक्रम, कार्यकर्त्यांची बांधणी आणि आगामी कार्ययोजनांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

देशाच्या राजधानीतील इंदिरा भवन येथे झालेल्या या भेटीला संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले. सेवा दलाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोच वाढविणे, युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

सेवा दलाच्या कार्याचा विस्तार करताना सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक शिस्त यांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी उल्लेखित करण्यात आली. आगामी काळातील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यावरही चर्चा झाली.याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, कामठी नगर परिषद गटनेता काशिनाथ प्रधान, माजी नगरसेवक नीरज लोणारे,कामठी शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव,नगरसेवक अनिल सूर्यवंशी, अलंकार गजभिये, येरखेडा नगर पंचायत नगरसेवक राजेश बनसिंगे आदी उपस्थित होते.

दिल्लीतील या भेटीमुळे सेवा दलाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने नव्या कार्ययोजनांना दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.