spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मेघा सुनिल बिसेन यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

गोंदिया :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस मेघा सुनिल बिसेन यांची गोंदिया जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविकांत खुशाल बोपचे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी व महिलांचा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी बिसेन यांच्या वतीने नियोजनबद्ध कार्य होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.

मेघा बिसेन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मेघा बिसेन यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Popular Articles