spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे Menopause Clinic चे उद्घाटन

गडचिरोली :- दिनांक १४/०१/२०२६ रोजी मकर संक्रांत दिनाचे औचित्य साधून महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे Menopause Clinic (रजोनिवृत्ती उपचार व समुपदेशन क्लिनिक) चे उद्घाटन करण्यात आले.

सदर Menopause Clinic चे उद्घाटन डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. गडचिरोली, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ‍जि.प. गडचिरोली, तसेच व डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकीय अधिकारी प्र. यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या क्लिनिकच्या माध्यमातून रजोनिवृत्ती कालावधीत महिलांना येणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबाबत सखोल तपासणी, उपचार, समुपदेशन तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य समस्यांकडे वेळीच लक्ष देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सदर कार्यक्रमप्रसंगी डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, डॉ. मनीष मेश्राम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक प्र., डॉ. प्रशांत पेंदाम, बालरोगतज्ञ वर्ग १, डॉ. अमित साळवे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. प्रशांत आखाडे, स्त्रीरोग तज्ञ, डॉ. मेघा सावसाकडे, स्त्रीरोग तज्ञ, डॉ. अस्मिता राजे, रेडियोलॉजिस्ट, रुग्णालयीन अधिकारी, शुश्रुषा सवर्ग अधिकारी/कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी. आशा कार्यकर्ती, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. नवनिर्वाचित नगरसेविका, नगर परिषद गडचिरोली वर्षा शेडमाके प्रमुख पाहुणे या उद्धाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार महिला व बाल रुग्णालय गडचिरोली तसेच NCD टीम सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी केले. तीळसंक्रात सणाचे औचित्य साधून उपस्थित महिला अधिकारी, कर्मचारी यांना हळद कुंकू लावून तीळगूळ वाटण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी Menopause Clinic सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.