नागपूर :- चर्मकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने आयोजित केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री स्व. भानुताई गडकरी ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मागील सोळा वर्षांपासून चर्मकार सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वर्ग १० व १२ वी मध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नागपूर शहर व ग्रामीण मधील ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य समाज मेळाव्यात जाहीर सत्कार कार्यक्रम येत्या दि. २८ सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी ११:३० वाजता. शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह, महाल, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, समारंभाचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार परिणय फुके, आमदार मोहन मते, आमदार प्रविण दटके, आमदार संदीप जोशी, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल सोले, भा.ज.पा. नागपूर महानगर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, उपाध्यक्ष नरेश बरडे, महामंत्री रितेश गावंडे, सफाई कामगार आयोग अध्यक्ष सतिश डागोर, चर्मकार सेवा संघ संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, श्रीराम मांडस्कर व डॉ. राजेंद्र चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.
मार्कशिटस् दिलेल्या नागपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व समाज बांधव भगिनींनी या सामाजिक व शैक्षणिक समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन चर्मकार सेवा संघाने पत्रकाद्वारे केलेले आहे.




