Home Latest News विठ्ठलनगरात जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा

विठ्ठलनगरात जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा

0
60

नागपुर :- विठ्ठल नगर क्रमांक एक जेष्ठ नागरिक समिती तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येतो. परंतु नवरात्र उत्सव असल्याने सदर कार्यक्रम हा तीसऱ्या आठवड्यात साजरा करण्यात आला. राबविण्यात येणाऱ्या सामूहिक वाढदिवस कार्यक्रमा अंतर्गत माहे सप्टेंबर मध्ये जन्मदिवस असणाऱ्या सात जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस 20 सप्टेंबर रोजी सार्वजनिक हनुमान मंदिरच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा काळे तर या कार्यक्रमात महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष  सिद्धू कोमजवार यांना नेमण्यात आले होते. त्यांनी जेष्ठ नागरिकांना वाढदिवसाच्या सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना येणाऱ्या भविष्यात ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध कशा करून देण्यात येईल. यावर चर्चा करून कोमजवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अध्यक्ष प्रेमदास नंदनवार, दिवाकर शेलुरे, राजकुमार देशकर, रामकृष्णा ठावरे, भगवानदास मेहता, आशा तवणे, वर्षा कावळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी रमेश डफरे, केवलराम पटोले, किशोर मेश्राम आणि विशेष पाहुणे देवराव प्रधान यांची उपस्थिती होती. संचालन नरेंद्र त्रिवेदी यांनी तर आभार शामराव गोमासे यांनी मानले. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.