Home Latest News महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड;आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड;आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले&period; सिकलसेलचे रुग्ण &OpenCurlyQuote;शून्यावर’आणण्यासाठी सर्वप्रथम रुग्णांची अचूक ओळख पटवणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी तपासण्या जलदगतीने करून सापडणाऱ्या रुग्णांना तात्काळ ओळखपत्र देऊन त्यांची सुसंगत नोंद ठेवण्याची सूचना दिली&period; या कामात कोणताही विलंब किंवा निष्काळजीपणा चालणार नाही&comma; एकही रुग्ण नोंदणीविना राहू नये&comma; अशी स्पष्ट तंबीही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर येथील आरोग्य सेवा कार्यालयात मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतलेल्या बैठकीत सिकलसेल नियंत्रणाच्या राज्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला&period; गडचिरोली&comma; नंदुरबार&comma; पालघर आणि मेळघाट या आदिवासीबहुल भागांच्या संदर्भात विशेष चर्चा झाली&period; बैठकीला आमदार डॉ&period; मिलिंद नरोटे&comma; रामदास मसराम&comma; केवलराम काळे&comma; हरिश्चंद्र भोये&comma; आमश्या पाडवी&comma; राजेश पाडवी&comma; मंजुळा गावित तसेच आरोग्य सेवा संचालक डॉ&period; नितीन अंबाडेकर&comma; सहसंचालक सुनिता गोल्हाईत आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी पातळीवरील आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-24001 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;11&period;12&period;2025&period;2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयांत सिकलसेल रक्त तपासणीसाठी शासनाची स्वतःची यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे सांगितले&period; खाजगी संस्थांवर अवलंबून न राहता ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ&comma; ब्लड स्टोरेज सुविधा आणि औषधसाठा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले&period; सिकलसेल रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक कार्यक्रमांना गती देण्याचा त्यांनी सांगितले&period; आदिवासी भागात स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोटेशन पद्धतीने अन्य भागातील तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्यपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांची समस्या लक्षात घेऊन चौदाशे ते पंधराशे पदभरती लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले&period; बाह्य यंत्रणेद्वारे पदभरतीची गरज भासल्यास ती एजन्सीमार्फत न करता थेट कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या सेवा करारावर करण्यात यावी याबाबत त्यांनी नियोजन करण्यास सांगितले&period; पदभरतीसंदर्भात पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल&comma; असेही त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोग्य विभागातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना कोणत्याही सेवेसाठी बाह्य यंत्रणांवर अवलंबून न राहता विभागाने स्वतःची क्षमता वापरून कामकाज करावे&comma; असे आबिटकर यांनी स्पष्ट केले&period; आशासेविकांना रोज २५ तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज १० गृहभेटी देण्याची जबाबदारी देण्यात आली असून तिची काटेकोर अंमलबजावणी केली गेल्यास सिकलसेल रुग्णांचे निदान जलदगतीने करता येईल&comma; असेही त्यांनी सांगितले&period; जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांचा कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही&comma; अशी कडक तंबीही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>१०० टक्के संस्थात्मक प्रसूती व्हावी यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले&period; धारणी ग्रामीण रुग्णालय तसेच नंदुरबारमध्ये औषधसाठा अपुरा असल्याचे आढळल्याने आरोग्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाईचे आदेश दिले&period; आरोग्य यंत्रणा नागरिकांसाठी कार्यरत असली पाहिजे&semi; अन्यथा परिणाम गंभीर होतील&comma; असा इशाराही त्यांनी दिला&period; राज्य व जिल्हास्तरावर नेमण्यात आलेल्या सिकलसेल समन्वयकांकडून अपेक्षित काम होत नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत गडचिरोलीचे आमदार डॉ&period; मिलिंद नरोटे यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयांत सिकलसेल रक्त तपासणी युनिट उभारण्याची मागणी करत&comma; उपचारासाठी आवश्यक संशोधन व वैज्ञानिक मूल्यांकनानुसार औषधोपचार सुनिश्चित करण्याची आवश्यकता मांडली&period; पदोन्नतीनंतर नियुक्त झालेले तसेच नव्याने भरती झालेले डॉक्टर आदिवासी व दुर्गम भागात प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावेत&comma; असेही त्यांनी आग्रहाने सांगितले&period; आमदार केवलराम काळे यांनी धारणी भागात औषधसाठ्याचा तुटवडा असल्याबद्दल खंत व्यक्त केली&period; आमदार अंधार पाडवी यांनी बाह्य एजन्सीतून कर्मचारी घेण्याऐवजी प्रथम कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केल्यास अधिक सोयीस्करपणे मनुष्यबळ उपलब्ध होईल&comma; असे मत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत सिकलसेलमुक्त महाराष्ट्रासाठी एकत्रित&comma; काटेकोर आणि वेळबद्ध काम करण्यावर भर देण्यात आला&period; राज्यभरातील सर्व आरोग्य यंत्रणांनी पूर्ण समन्वयाने या मिशनमध्ये सहभागी व्हावे&comma; अशी अपेक्षा आरोग्यमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आरोग्य यंत्रणेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version