spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिकागोतील NCSL Summit 2026 मध्ये आमदार राजू तोडसाम यांचा सहभाग

– महाराष्ट्रासाठी जागतिक अनुभवांचा लाभ घेण्याचा निर्धार

पांढरकवडा :- अमेरिकेतील शिकागो येथे सुरू असलेल्या NCSL Legislative Summit 2026 मध्ये आर्णी–केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजू तोडसाम सहभागी झाले असून, लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने जगभरातील तज्ज्ञांसोबत विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

NLC Bharat आयोजित International Capacity Enhancement Program (ICEP) 2026 अंतर्गत होत असलेल्या या शिखर परिषदेत विविध देशांतील विधिमंडळांच्या कार्यपद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रशासनातील वापर, कायदेविषयक नवकल्पना तसेच लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात येत आहे.

या दौऱ्यादरम्यान आमदार तोडसाम यांनी स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये शिकागो येथे जागतिक धर्मपरिषदेत बंधुभावाचा संदेश दिलेल्या ऐतिहासिक Fullerton Hall ला भेट दिली. या ऐतिहासिक स्थळाला भेट देणे हा अत्यंत प्रेरणादायी अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनातील वापर आणि प्रभावी लोकशाही व्यवस्थेचे अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करत जनहित, विकास आणि सक्षम लोकशाहीसाठी जागतिक अनुभवांचा लाभ महाराष्ट्राला मिळवून देण्याचा प्रयत्न कायम राहील, असे आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.