Home Latest News मॉयल कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा

मॉयल कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा

0
29

खापा, वार्ताहर :- मॉयल कामगार संघटना शाखा गुमगाव माइनच्या वतीने गुरुवारी (दि. ११) संघटनेचा २२ वा वर्धापन दिन शाखा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मॉयल कामगार संघटनेचे केंद्रीय सल्लागार अनुप सोना उपस्थित होते. यावेळी शाखाध्यक्ष रवींद्र डोंगरे, शाखा सचिव अनवर अली, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय एल. कठौते, लोमेश भगत, कार्याध्यक्ष सुनील पटेल आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात शाखा सचिव अनवर अली यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शाखाध्यक्ष रवींद्र डोंगरे यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. संचालन विजय एल. कठौते यांनी केले. आभार सुनील पटेल यांनी मानले. आयोजनासाठी लीलाधर जिभे, दिनबंधू नायक, श्रावण मलवे, संजय शेंडे, भूषण खुरसंगे, रंजित रौतिया, इंद्रजित गजभिये, खेमराज शेंडे, मनोज शेंडे, विक्रांत कोचे, चंदू कठौते, सुरेश शेंडे, शुभम दियेवार, नितेश गजभिये, वंदना गजभिये, अनिता हजारे, राखी निकोसे, ममता कठौते आदींनी सहकार्य केले.