– नागपूर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गुरुपुंजा सत्कार
नागपूर :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी मोहत्सावानिमित्त श्री गुरुदेव प्रचार विभागाच्या वतीने राष्ट्रसंतांच्या साहित्यांचा विविध क्षेत्रांमध्ये ग्राम गीतेंच्या तत्त्वानुसार प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचार समितीचे सचिव भैयालाल माकडे खसाळा, नरखेड तालुक्यातील डॉक्टर अर्चना कळंबे, रामटेक तालुक्यातील अमृता कडूकर हे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यकर्ते ठरले. गुरुदेव सेवा मंडळ सर्वाधिकारी लक्ष्मणरावजी गमे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
वंदनीय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीता जीवन परीक्षेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षकांना साहित्य पुरविण्यात या कार्यकर्त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत व राष्ट्रसंतांचे साहित्य वाङमय परीक्षा आयोजित करून प्रचारक घडविण्याचे कार्य या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. व पुढेही असेच अविरत सुरू राहण्याची विद्र त्यांनी हाती घेतलेली आहे. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यां चे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा दरवर्षी वंदनीय राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सावात पार पडतो. असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.




