spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसच्या नागपूर विभाग प्रभारी समन्वयकपदी मोरेश्वर भादे यांची नियुक्ती

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागात नागपूर विभागाचे प्रभारी समन्वयक म्हणून मोरेश्वर भादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी २७ मे २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. ओबीसी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटन बळकट करणे, युवक व महिलांचा सहभाग वाढविणे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रानुसार मोरेश्वर भादे यांच्यावर विभागातील जिल्हानिहाय संघटन मजबूत करणे, ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठका व संवाद कार्यक्रम आयोजित करणे, पक्षाच्या धोरणांचा प्रचार-प्रसार करणे, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्नांवर अहवाल सादर करणे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाशी नियमित समन्वय ठेवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोरेश्वर भादे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भादे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Popular Articles