खापा १० :- मोहरम हा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन हुसैन यांच्या शहादतमध्ये (शहीद ) साजरा केला जातो. जितके मुस्लिम बांधव मोहरम या सणाला मानतात तितकेच हिंदू बांधव सुद्धा मोहरम साजरा करतात. खापा येथे सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण साजरा करतात. खापा येथे मुस्लिम व हिंदू यांच्यातील असलेली एकता यामधून दिसून येते.
मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असुन मोहरमच्या 1 तारखेपासून या सणाला सुरवात होत असून मोहरमची 9 व 10 तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. मोहरमच्या 9 तारखेला (5 जुलै) खापा येथे मस्जिद मध्ये मिलाद झाली आणि खापा मस्जिदचे शाही इमाम मकसुद आलम यांनी सर्वांसाठी दुआ केली. मोहरमच्या 10 तारखेला (6 जुलै) मदार शाह बाबांच्या निंबा खाली नवयुवकांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
मोहरम निमित्त इमरान अली सैय्यद, युनुस कुरेशी, सईद कुरेशी, मस्तान कुरेशी, अहेफाज कुरेशी, प्यारु शेख, साजिद शेख, मोहसिन पठाण, अझरुद्दीन शेख, कुद्दुस कुरेशी, इमरान शेख, गोलू शेख, आरिफ कुरेशी, शकील कुरेशी, शाहिद खान, ज़ोहेब कुरेशी, मुजाहिद कुरेशी, अल्तमश कुरेशी व हाजी बाबा उर्स कमेटी आणि समस्त शहरवासीयांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात करुण सुव्यवस्था ठेवली. दरवर्षी प्रमाने यावर्षी मोठ्या प्रमाणत नागरिकांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.




