spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुंडीकोटा बनले आहे समस्याचा माहेरघर प्रहार तालुका अध्यक्षाचे प्रशासनाला निवेदन सादर

 

अमरदिप बडगे, तिरोडा १६ :- तालुक्यातील मुंडीकोटा परिसरातील समस्या तसेच मूलभूत सुख सुविधाचा अभाव असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाला निवेदन देऊन समस्याचे निराकरण करण्यात यावे .अशी मागणी केली आहे.

मुंडीकोटा हे गाव मुख्य बाजारपेठचे गाव असून परिसरात वैद्यकीय सेवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने ग्रामीण रुग्णालय उभारुन सोनोग्राफी प्रसूतीगृह सारख्या अनेक सुविधाचा उपलब्ध करून द्यावे. परिसरात शेती व्यवसाय असल्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याकरिता जलसिंचनाच्या सोई उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी उपलब्ध होऊ शकेल . गोंदिया इतवारी मेमो ट्रेन कोरोना काळापासून बंद झाली ती सुरू करण्यात यावी. जागृती पत संस्था प्रकरण तुमसर तिरोडा घोगरा घाटकुरोडा, मार्ग तसेच तिरोडा तुमसर केसलवाडा मार्गाची बस सुरू करण्यात यावी. आय डी बी आय बँकेतील लिफ्टची व्यवस्था करून द्यावी. सीआरपी तसेच महिला बचत गटांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड त्वरित उपलब्ध करून द्यावे. पशुधन ला सरकारी विमा लागू करावा सर्प दंश किंवा अशा रोगाने पशु मृत्युमुखी पडतात त्यासाठी विमा योजना लागू करावे. जल जीवन शुद्धीकरण मिशन अंतर्गत अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावी आरोग्य तसेच शासकीय कर्मचारी आपल्या मुख्यालयी रहावे.अशा अनेक मागण्या धरून प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाला निवेदन दिले आहे पुर्ण न झाल्यास आंदोलनांचा इशारा देखिल प्रशासनाला दिला आहे..


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.