युको बँक तर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

0
52
सचिन चौरसिया, रामटेक १६ :- युको बँक नगरधन येथे एक दिवासीय कार्यशाळेचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्रच्या सभागृहात गुरुवार (दि.१४) ला करण्यात आले. भारतात सर्वांत मोठी असलेली युको बँक ही शेतकरीभिमुख बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेमार्फत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना खेडेगावांमधील व शहरी भागांमधील प्रत्येक खातेदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अशी प्रतिपादन नागपूर आंचल कार्यालयाचे झोनल प्रबंधक माहेश्वरी यांनी केले. केंद्र सरकार, राज्य सरकार, महामंडळे यांच्या कर्ज योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या योजनांचा त्यांना लाभ व्हावा, या पारदर्शक हेतूने आयोजित केलेल्या या कार्यशाळेतून मार्गदर्शन घेऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल. शासन सामान्य जनतेसाठी हिताच्या योजना राबवीत आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान पीकविमा योजना, शेतीपंपासाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री सौर पंप योजना, वैद्यकीय उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना, घरकुल योजना, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवित आहे. त्याचा लाभ नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घ्यावा. त्यासाठी सर्वोतपरी मदत युको बँकेमार्फत केली जाईल. बँक ही फक्त कर्ज घेतल्यानंतर ते जप्त करण्यासाठी नाही. ते बँकेचे पहिले प्राधान्य नसून व्यवसायाला मदत करण्याचे आहे. कार्यशाळेत बँकेचे वरिष्ठ लिपिक संजय बोरकर यांनी प्रास्तविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता बँकेचे सहप्रबंधक महेश सर व नितीन तरारे यांनी प्रयत्न केला. कार्यशाळेला गावातील जास्तीत-जास्त महिला, नागरिक उपस्थित होते