spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आशा वर्कर च्या प्रश्नावर योग्य तोडगा काढण्याचे अति. मनपा आयुक्त यांचे आश्वासन

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा तर्फे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचे सोबत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार महानगर पालिका आरोग्य विभागाचे मुख्य लेखापाल निलेश बाभरे प्रामुख्याने उपस्थित होते. सीटू तर्फे कॉ.राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली. केंद्राचे थकीत असलेले ९ महिन्या पासूनचे मानधन त्वरित काढण्याकरता प्रयत्न करा. आशा वर्कर यांच्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणून चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. पावसाळ्यात करण्यात आलेला डेंगू सर्वेक्षणाच्या कामाचा थकीत मोबदला त्वरित द्या. सी बॅक फॉर्म नोंदणी, आरोग्यवर्धिनी व आयुष्यमान कामाच्या थकीत मोबदला त्वरित द्या. अशा विविध मागण्यांना घेऊन अतिरिक्त आयुक्त यांच्याशी शिष्टमंडळांनाही चर्चा केली असता यावर त्वरित तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले. विविध प्रकारच्या अशांच्या कामाच्या मोबदला थकीत असून आशा वर्कर मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा नवीन नवीन काम विना मोबदला आशा वर्कर कडून करून घेण्याकरता दबाब टाकण्यात येत आहे. त्वरित तोडगा न काढल्यास पुढे येणाऱ्या निवडणुकीवर आशा वर्कर सह परिवार बहिष्कार टाकतील अशा सूचना संघटनेमार्फत देण्यात आल्या. सध्या कुष्ठरोग शोध मोहीम संपूर्ण देशभर चालू असून आर्थिक अडचणी मध्ये आशा वर्कर सापडल्या असल्यानंतर सुद्धा कुष्ठरोग तपासणी व शोध घेण्याचे काम करण्यात येत असून मोठ्या हिमतीने आशा वर्कर काम करून कुष्ठरोग शोधण्यात सफल होत आहेत. त्याच्या मोबदला सुद्धा आशा वर्कर ला मिळावा. अशी संघटनेतर्फे मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात कॉ. राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, माया कावळे, कॉ. प्रमोद कावळे, मयुरी सुखदेवे प्रामुख्याने उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.