किशोर साहू, मौदा ,ता. २५:- जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहे. विद्यार्थी दररोज वर्तमानपत्र वाचन करून त्यातील नवीन शब्द लिहून घेतात आणि त्यांचे अर्थ शोधून लिहून आणतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शब्द संपत्तीत वाढ झाली असून वाचनाची आवड निर्माण होत आहे आणि सामान्य ज्ञान प्राप्त करून विद्यार्थी सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत.
या उपक्रमाचे गावस्तरावर कौतुक होत आहे. मुख्याध्यापक पठाण तब्बसूम यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.








