spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवाची कथा, उपासना आणि परंपरा जगभर पोहोचविण्यासाठी ‘bappa.org’ उपक्रमात सहभागी होण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

चंद्रपूर :- गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, या उत्सवातील विविध कथा, उपासना, परंपरा तसेच आरती यांची माहिती डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘bappa.org’ या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवाशी संबंधित कथा, पाककृती, पारंपरिक प्रथा तसेच आरती यांची माहिती नोंदविता येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि अनुभव डिजिटल स्वरूपात नोंदविल्यास ते जगभरातील गणेशभक्तांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

असा घ्या सहभाग

नागरिकांनी bappa.org या संकेतस्थळावर जाऊन खालीलप्रमाणे सहभाग नोंदवावा—

संकेतस्थळावरील ‘माहिती (Information)’ या पर्यायावर क्लिक करावे.

‘तुमची कथा सांगा’ या पर्यायाद्वारे आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती नोंदवावी.

कथा, पाककृती, परंपरा किंवा थेट आरती (Live Aarti) यापैकी योग्य पर्याय निवडावा.

आपल्या अनुभवाची अथवा परंपरेची माहिती भरून ती सादर करावी. मोबाईलमधील Location बंद असल्यास आवश्यक ठिकाणी जवळच्या स्थानाचा पिनकोड किंवा माहिती नोंदवावी.

गणेशोत्सवातील विविध आठवणींना डिजिटल व्यासपीठ

‘bappa.org’च्या माध्यमातून नागरिकांना आरत्या आणि गाणी, गणेशोत्सवातील अनुभव व आठवणी, आरतीचे रेकॉर्डिंग तसेच गणपती बाप्पाचे फोटो डिजिटल स्वरूपात नोंदवून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यामुळे गणेशोत्सवाशी निगडित स्थानिक परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्यास हातभार लागणार आहे.

चंद्रपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाची कथा आणि परंपरा जगभरातील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागासाठी संकेतस्थळ : bappa.org

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर गणेशोत्सवातील आपल्या परंपरा जपूया… डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचवूया!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.