– माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मनपात आदरांजली
नागपूर :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त (ता. २१) मनपाच्या मुख्यालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपायुक्त राजेश भगत यांनी कर्मचाऱ्यांना दहशतवादाचा प्रतिवाद करण्याची शपथ दिली. ![]()
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, प्रवीण वानखेडे यांच्यासह अग्निशमन जवान यांनीही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे अजनी चौकातील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी माजी नगरसेवक तानाजी वनवे, दिलीप पनकुले उपस्थित होते.