spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारत निर्माण आंदोलनातर्फे अभिवादन

– चितारओळी येथे माळ्यार्पण; सत्य, अहिंसा आणि सामाजिक एकतेचा संदेश

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत निर्माण आंदोलनाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता इतवारीतील चितारओळी येथे माळ्यार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. गौतम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर शहर संघटक संतोष भुजाडे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, शांतता, बंधुता आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजात एकता, सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून, राष्ट्रनिर्माणासाठी सामाजिक एकता, समानता आणि शांततेचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील, दक्षिण विधानसभा संयोजक; भारत ठाकरे, पूर्व विधानसभा संघटक; तुषार ढोबळे; आशिष खुबळकर; कुलवंत सिंग भामरा; मनोज जरेल यांच्यासह भारत निर्माण आंदोलनाचे दाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करीत समाजात सकारात्मक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला.

Popular Articles