spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बनावट भरती जाहिरातप्रकरणी मनपाची पोलिसात तक्रार

– भरतीसाठी मनपाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

नागपूर :- काही समाजकंटकांनी नागपूर महानगरपालिकेत प्रत्येक झोनमध्ये ‘प्रिंटर ऑपरेटर व डाक्युमेंट स्कॅनर’ भरतीसाठी सोशल मीडियावर बनावट जाहीरात देऊन युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने संबंधितांविरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

इच्छुक युवक-युवतींनी महानगरपालिकेतील भरतीसाठी केवळ मनपाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, कोणत्याही सोशल मिडीयावर पदाची भरतीबद्दलच्या जाहीरातींवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मनपामध्ये कंत्राटी पद्धतीवर १०० जणांची भरती होणार असल्याची जाहिरात सोशल मिडीयावर प्रसिद्ध होत आहे. यात प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी १० जणांची प्रिंटर ऑपरेटर व डाक्युमेंट स्कॅनर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात सोशल मिडीयावर दिली आहे. यावर दोन मोबाईल क्रमांक देण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या भरतीसाठी कुणाशीही मोबाईलवर संपर्क करण्याची आवश्यकता नाही. मनपाची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असून, कोणत्याही पदासाठी भरती करावयाची असल्यास मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात दिली जाते. यासाठी https://www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, अन्य दुसऱ्या कोणत्याही सोशल मिडीयावर असलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेऊ नये. त्या जाहिराती फेक आहेत.

हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर तात्काळ दखल घेत मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ही जाहिरात पूर्णपणे बनावट असून यात संबंधितांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

Popular Articles