spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपातर्फे बॅरि.शेषराव वानखेडे यांना जयंती निमित्त अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या जयंती निमित्त बुधवारी (ता:२४) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी मनपा हिरवळीवरील त्यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करून अभिवादन केले.

बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. भारतीय क्रिकेट बोर्ड भूतपूर्व अध्यक्ष होते. मुंबईचे सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम त्यांचा नावावर आहे. त्यांची मुलगी  कुंदा विजयकर सुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर होत्या. त्यांचा जयंती निमित्त मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता उज्ज्वल लांजेवार सतीश गुरनुले, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, प्रमोद हिवसे, जितेश धकाते यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच पं. बच्छराज व्यास यांच्या जयंतीनिमित्त बडकस चौक महाल येथील पुतळ्याला मल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.