spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

– मनपात सद्भावना शपथ

नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर लिला हाथीबेड यांनी अजनी चौकातील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक तानाजी वनवे, माजी नगरसेवक दिलीप पनकुले, अनिल अहिरकर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

तसेच सद्भावना दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून राष्ट्रीय सद्भावना दिनाच्या अनुषंगाने सद्भावना शपथ घेण्यात आली. यावेळी मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी अमित, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी उपस्थितांना सद्भावना शपथ दिली.

Popular Articles