नागपूर :- स्वच्छतेची शिकवण देत समाज सुधारणेसाठी आयुष्य वेचलेले समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त सोमवारी (ता.23) मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षा समोरील दालनात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला उपमहापौर लिला हाथीबेड व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


याप्रसंगी मनपाचे विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त मंगेश खवले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाजाचे अध्यक्ष संजय भिलकर, रमेश काळे, अरविंद क्षिरसागर, विजय लोणारे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.




