spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२७ मार्च रोजी मनपाची स्थायी समिती व सर्वसाधारण सभा

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली असुन त्यानंतर दुपारी २.०० वाजता मनपाची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

२० मार्च रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय स्थायी समिती सभेनंतर ही पहिली स्थायी समिती सभा असणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक अर्थसंकल्पाबाबत विशेष स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकावर सविस्तर विचारविनिमय करून मंजुरी देण्याचा विषय सभेपुढे मांडण्यात येणार आहे.

तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यासंदर्भातील विषयही सभेत घेण्यात येणार आहे. याशिवाय विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात येतील.

सर्व संबंधित सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles