– अन्नपूर्णा स्वीट मार्टवर ५ हजारांचा दंड; १२ ते १३ किलो प्लास्टिक जप्त
चंद्रपूर :- सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास आळा घालण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरात तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत महाकाली प्रभाग क्र. १२, स्वच्छता विभाग झोन क्र. २ (ब) अंतर्गत बागला चौक येथील अन्नपूर्णा स्वीट मार्ट या दुकानाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान दुकानात अंदाजे १२ ते १३ किलो सिंगल यूज प्लास्टिक आढळून आले. त्यानुषंगाने संबंधित दुकानमालकावर प्रथम वेळेस रु. ५,०००/- दंड आकारण्यात आला असून, आढळून आलेले सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले.
शहरातील दुकानदार, व्यावसायिक आस्थापना व नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात महानगरपालिकेची तपासणी व नियमानुसार कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
या मोहिमेंतर्गत महेंद्र हजारे, स्वच्छता अधिकारी, दिनेश खोटे, प्र. शिपाई, शरद बकसरिया, सफाई कामगार, भिमन्ना आत्राम, कंत्राटी सफाई कामगार, राहूल गगपल्लीवार (NDS Squad) सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार स्वच्छता विभाग,झोन क्रमांक 2(ब), सदरची कार्यवाही च्या वेळेस उपस्थित होते.





