spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकशाही बळकटीसाठी नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी भरला ‘SIR’ फॉर्म

– नागरिकांना वेळेत सहभागाचे आवाहन; मतदार यादी अचूक करण्यासाठी पुढाकार

कामठी :- कामठी शहरात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला पाठिंबा दर्शवत कामठी नगर परिषदचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी स्वतःचा SIR फॉर्म भरून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच सर्व पात्र मतदारांनी वेळेत फॉर्म भरून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अजय अग्रवाल यांनी फॉर्म भरल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले की, “मी स्वतः SIR फॉर्म भरून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मतदार यादी पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी वेळेत आपला SIR फॉर्म भरून या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”

ते पुढे म्हणाले की, शहरातील विविध प्रभागांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच विशेष हेल्प डेस्कच्या माध्यमातून नागरिकांना SIR प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केले जात आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित मुदतीत फॉर्म सादर करून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे कामठी शहरात मतदार नोंदणी व पुनरीक्षण प्रक्रियेबाबत जनजागृती वाढत असून नागरिकांचा सहभागही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

Popular Articles