spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगाजी महाराजांचा जयजयकार

– बेला येथे जयंती उत्साहात

बेला :- सालाबादाप्रमाणे यंदाही नाभिक समाज बांधवांच्या वतीने संत नगाजी महाराजांची पुण्यतिथी पांडव पंचमीला बेला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्य भोयर मंगल कार्यालयासमोरील मंदिरात अभिषेक, पूजा,अर्चना,भजन,गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रमात संत नगाजी यांचा असंख्य भक्तांनी जयजयकार केला.

संत नगाजी महाराज नाभिक समाजबांधवांचे आराध्य दैवत आहे.दिवाळी,पंचमीचे शुभ पर्वावर महाराज जन्मले.त्यांचेवर अपार श्रद्धा असणारे शेकडो भक्तगण बेला भागात आहे. मागील वर्षी पुरातन महादेव मंदिराचा जिर्णोद्धार करून त्यामध्ये संत नगाजी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.अनेक वर्षापासून महाराजांची जयंती व पुण्यतिथी बेला येथे उत्साहात साजरी करण्यात येते. त्यानुसार यंदाही महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. रात्र भजन व गोपालकाल्याचे भजनात भाविक तल्लीन झाले होते त्यांनी बुलंदपणे महाराजांचा जयघोष केला. मंदिर नजीकच्या भोयर मंगल कार्यालया तील महाप्रसादांचा असंख्य भाविकांनी आस्वाद घेतला. रात्री १० वाजता राम मंदिरातील विहिरीत घट विसर्जन करून जयंती सोहळ्याची थाटात सांगता झाली. जयंतीचे यशस्वीतेसाठी पंचकमेटी, गावातील नागरिक व नाभिक समाजाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles