spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर-हैद्राबाद दृतगती महामार्ग कॉरिडॉरच्या भागधारकांची बैठक

नागपूर :- वर्ष 2047 च्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या योजनेचा भाग म्हणून प्रस्तावित नागपूर-हैद्राबाद दृतगती महामार्ग कॉरिडॉरच्या विविध भागधारकांची बैठक विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

प्रस्तावित महामार्ग कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतांना वने, वन्यजीव, कोळसा ब्लॉक आदींना नुकसान पोहचणार नाही याची काळजी घेत भागधारकांनी संरचना आखावे. यासाठी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून संरचनेत आवश्यक त्या सुधारणा कराव्या, अशा सूचनाही बिदरी यांनी या बैठकीत केल्या. नागपूर-हैद्राबाद महामार्ग कॉरिडॉरसाठी तयार करण्यात आलेल्या विविध पाच पर्यायांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय महामार्ग मास्टर प्लॅन 2047 अंतर्गत देशात आधुनिक व एकात्मिक वाहतुकीचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. याचच भाग म्हणून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील नागपूर व हैद्राबाद या दोन शहरांदरम्यान दृतगती महामार्ग कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत आहे. प्रादेशिक विभागांची जोडणी, वाहतूक नियंत्रित करणे, या कॉरिडॉरलगत सामाजिक व आर्थिक विकास साधणे आदी उद्देशाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकरण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी आर. पी. सिंग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता एन. एस. अन्सारी, सहआयुक्त पुनर्वसन प्रदिप कुलकर्णी, वेर्स्टन कोल लिमिटेडचे महाव्यवस्थापक ओ. एस. सुजितसेन, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता अब्दुल जावेद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर संबंधित उपविभागीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.