नागपूर महापालिका निवडणूक : काँग्रेसची ५१ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी – विकास ठाकरे

0
133

नागपूर :– आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून, पक्षाची ५१ जागांवर तयारी पूर्ण झाल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. मात्र, आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील १५१ जागांसाठी काँग्रेसकडे तब्बल १,५०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवार निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी जिल्हानिहाय निवड मंडळे स्थापन करण्यात आली असून, सर्वांच्या एकमताने उमेदवारांची अंतिम यादी तयार करून ती मुंबईला पाठवली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीची गरज भासली तर त्यासाठीही आम्ही तयार राहू. परंतु, ५१ जागांवर स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी शंभर टक्के पूर्ण आहे.”