किशोर साहू, मौदा :- यंदा महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. त्यात मौदा तालुक्याचाही समावेश आहे. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धन व जलसंधारण ची कामे युद्ध पातळीवर सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासन व आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून मौदा तालुका सह जिल्ह्यात व नंतर संपूर्ण महाराष्ट्रात नाले व नद्यांवर ताळपत्री बंधारा बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे व होणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेताजवळील नाल्यावर किंवा गावातील नदीवर किंवा नाल्यावर ताडपत्री बंधारे बनवायचे असल्यास त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या गावातील सरपंचांनी फोन करावे, असे आव्हान राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यातर्फे करण्यात आले होते. ग्रा प खरडा सरपंचा वैशाली मुरलीधर तांबुलकर यांनी गावातील नाल्यावर ताडपत्री बंधारा बनवण्यासाठी राज्यमंत्री जयस्वाल यांना फोन करताच, राज्यमंत्री जयस्वाल यांच्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला व गावातील नाल्यावर ताडपत्री बंधारे बनविण्यासाठी पोकलॅन्ड मशीन आले व बंधारे बनविण्यात आले.त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवले असून त्या पाण्याचा उपयोग शेतकरी त्यांच्या शेतातील रब्बी पिकाला, गावातील गुराढोरांना होणार आहे. या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यामुळे गावातील शासकीय , खाजगी विहीर व बोरवेल यांची पाण्याची पातळी उन्हाळ्यात जास्त खोलवर जाणार नाही. त्यामुळे खरडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा तालुका मंडळ उपाध्यक्ष मुरलीधर तांबुलकर यांच्यासह गावातील शेतकरी व नागरिकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आभार मानणारा व्हिडिओ मुरलीधर तांबुलकर यांनी नुकताच सोशल मीडियावर वायरल केलेला आहे.
Latest News
Related Posts
फोन करताच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रतिसाद, पोकलॅन्ड आले व ताडपत्री बंधारे बांधले – मुरलीधर तांबुलकर






