spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परिवहन विभागाद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या वतीने विद्यमाने तसेच ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेस प्रा. लि., ईका ट्रान्सवोल्ट मोबिलिटी (EKA Transvolt Mobility), जेबीएम ईको लाईफ (JBM Eco Life) आणि चलो मोबिलिटी (CHALO) यांच्या सहकार्याने गुरुवारी (ता.२६) आपली सिटी बस डेपो, खापरी नाका, वर्धा रोड, नागपूर येथे वृक्षारोपण, रक्तदान व भव्य मोफत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डेपो परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, हरित नागपूर आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त  मिलींद मेश्राम, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, माजी महापौर  दयाशंकर तिवारी, परिवहन समिती सदस्य विजय होले, प्रमिला मथरानी, परिवहन व्यवस्थापक, राजीव घाटोळे, परिवहन व्यवस्थापक गजानन नागुलवार, माजी नगरसेवक नागेश सहारे, ट्रॅव्हल टाईम सिटी बसचे  कमलेश वानखेडे, अमोल निवडे पाटील,सदानंद काळकर राकेश बारई, ईका कंपनीचे प्रतिनिधी रोशन सिंग, जेबीएम कंपनीचे अमोल ठाकरे, चलो मोबिलिटीचे विशाल कनोजे, सचिन गाडबील यांच्यासह इतर जनप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी तसेच परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये चालक, वाहक (कंडक्टर), मेंटेनन्स टीम, ऑफिस स्टाफ तसेच इतर कर्मचाऱ्यांसह एकूण ४५७ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यात बी.पी. व शुगर तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १९२, संपूर्ण बॉडी चेकअप करणारे १३५

कर्मचारी, थायरॉईड संदर्भात १२० कर्मचाऱ्यांची तपासणी, ७९ कर्मचाऱ्यांची दंत तपासणी, ५६ कर्मचाऱ्यांची ई. सी. जी. तपासणी, ३२ कर्मचाऱ्यांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. यावेळी १०६ कर्मचाऱ्यांना मोफत औषध वाटप, १८६ कर्मचाऱ्यांना डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वितरण आणि ६८ कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण संपूर्ण कार्यक्रमात अशा प्रकारे ४५७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

परिवहन विभागाच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चालक, वाहक, मेंटेनन्स टीम ऑफिस स्टाफ व इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्यामध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय पथक, संबंधित बस संचालन कंपन्यांचे व्यवस्थापन, चालक, वाहक, मेंटेनन्स टीम, ऑफिस स्टाफ तसेच सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल परिवहन विभागाच्या वतीने सर्व संबंधितांचे आभार व्यूक्त करण्यात आले.

Popular Articles