कळमेश्वर :- बाल्या हिरामण गुजर, रा. बिरसा नगर, कुही फाटा ता उमरेड याला दिनांक २३/११/२०२५ रोजी दुपारी शंकरपट गावात आरोपी नामे देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ, रा. वार्ड क २ सेलु, ता कळमेश्वर, जि. नागपुर तसेच त्याचे साथीदार यांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याला अग्निशस्त्राने गोळी झाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १०९, ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३),१९० भा.न्या. सं सहकलम ३,४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर प्रकरणी पोलीसांनी १) परमेश्वर उर्फे देवा पिसाराम एकनाथ, २) काशिराम बापुराव एकनाथ, ३) सावनाथ उर्फे सावन काशिनाथ एकनाथ ४) चंद्रशेखर उर्फे राहीन प्रेमलाल एकनाथ, ५) प्रेमलाल बोहुरजी एकनाथ ६) तपन पिसाराम एकनाथ ७) आकाश पिसाराम एकनाथ ८) मोरेश्वर पिसाराम एकनाथ सर्व रा. सेलु, ९) रोशन रतन एकनाथ १०) दिनेश ईश्वर सनेश्वर आणि आरोपी कं ११) अमृतसिंग तुफानसिंग भादा, वय २२ वर्षे, रा. वार्ड क १५ सरदार मोहल्ला कळमेश्वर, आणि आरोपी कं १२) जसपालसिंग चरतसिंग बावरी, वय २५ वर्षे, रा. वार्ड कं ६ गुरूनानक नगर, तळेगाव, ता. आष्टी, जि वर्धा यांना अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयात आरोपीतांकडुन प्राप्त माहीती आणि साखळी पुरावे जोडुन विशेष पथकाने आरोपी कं १३) करणसिंग चरणसिग चव्हाण, रा. निमखेडी, जि बुलढाणा ह.मु. जळगाव जामोद, ता.जि. बुलढाणा याला दिनांक १६/१२/२०२५ रोजी जळगाव जामोद येथुन ताब्यात घेतले. नमुद प्रकरणात आरोपी चंद्रशेखर उर्फ राहीन प्रेमलाल एकनाथ याने सदर अग्निशस्त्र (देशी माउजर) आरोपी कं ११) अमृतसिंग तुफानसिंग भादा, वय २२ वर्षे, रा. वार्ड क १५ सरदार मोहल्ला कळमेश्वर याचे कडुन विकत घेवुन आरोपी नामे देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याला दिले होते. आरोपी कं ११) अमृतसिंग तुफानसिंग भादा याला अटक करण्यात आली होती. अटकेत असतांना त्याने पोलीसांना माहीती दिली की, सदर अग्निशस्त्र आरोपी कं १२) जसपालसिंग चरनसिंग बावरी, वय २५ वर्षे, रा. वार्ड कं ६ गुरूनानक नगर, तळेगाव, याचे कडुन विकत घेतले. त्यामुळे दिनांक ०८/१२/२०२५ रोजी आरोपी कं १२ जसपालसिंग चरनसिंग बावरी याला तळेगाव आर्वी रोड, जि वर्धा येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली होती. आरोपी कं १२ याने मुख्य अग्निशस्त्र पुरवठादार आरोपी कं १३ करणसिंग चरणसिग चव्हाण याच्या मार्फतीने अग्निशस्व पाचोरी, जि बुन्हानपुर, राज्य मध्यप्रदेश येथुन आणल्याचे सांगितले होते. नमुद आरोपी कं १३ करणसिंग चरणसिग चव्हाण याला दिनांक १६/१२/२०२५ रोजी जळगाव जामोद येथुन ताब्यात घेतले. कळमेश्वर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. मा न्यायालयाने सदर आरोपीचा दिनांक १९/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.








