spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बकरी चोरीचे ६ गुन्हे उघड, ५ आरोपी अटक, एक वाहन, बकऱ्या आणि रोख रक्कमेसह ४,८९,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त 

पारशिवनी :- नयाकुंड व चिचभवन गावातून ०७ बकऱ्या चोरी गेल्याच्या तक्रारीवरून पारशिवानी येथे बकरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यावरून आरोपीतांनी एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार मधून बकरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने सदर गुन्हयात वापरलेली स्विफ्ट कार ही कळमना येथील आरोपी नामे शक्ती शिंदे हा वापरत असून तिचा वापर तो रामटेक पारशिवानी नयाकुंड व नगरधन या परिसरातील बकऱ्या चोरी करण्यासाठी वापरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.

दिनांक १७/१२/२०२५ रोजी आरोपी नामे शक्ती प्रकाश शिंदे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमना येथुन ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबूल केले तसेच त्याच्याकडे रामटेक पोलीस स्टेशन व पारशिवानी पोलीस स्टेशन हद्दीतील इतर बकरी चोरींच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने पारशिवणी येथे ३ बकरी चोरीचे गुन्हे तसेच रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत ३ बकरी चोरीचे गुन्हे असे एकुण ६ गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्हयात १) शक्ती प्रकाश शिंदे, वय २१ वर्ष, रा. गौरीशंकर नगर जुना कामठी, रोड नागपूर, २) संजय शंकर कोहाड, वय २६ वर्ष, रा. दुर्गा किराणा स्टोअर्स जवळ, जुना कामठी रोड नागपूर, ३) मुकेश गोवर्धन शाहू, वय २३ वर्ष रा. कलमना शनी मंदिर, पाणीटंकी युथ फोर्स जुना कामठी रोड नागपूर, ४) रोहिदास श्रावण कोळवते, वय ३८ वर्ष राहणार गौरीशंकर नगर, जुना कामठी रोड नागपूर आणि ५) सुमित मुरलीधर दाढे वय २५ वर्ष, रा. गौरीशंकर नगर पवनीकर यांचे घर समोर जुना कामठी रोड नागपूर यांना कळमना भागतुन सापळा रचुन ताब्यात घेतले. नमुद आरोपीतांकडुन १) एक लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच ०२ वी जी ९१९९ किंमत ४,००,०००/-, २) चोरीच्या बकऱ्या विकी करून मिळालेली रोख रक्कम ४४,५००/-, ३) तीन बकऱ्या किंमत १५,०००/- ४) आणि मोबाईल असा एकूण ४,८९,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Popular Articles