spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा नोंद  

उमरेड :- वृष्टी जैन सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड हे त्यांच्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना वाय पॉईंट, भिवापुर रोड, उमरेड येथे संशयीत वाहन १६ चक्का एल पी ट्रक क. एम एच २७ डी.एम. ५२७९ मिळुन आले. वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. नमुद वाहनामध्ये परवान्यापेक्षा जास्त रेती असल्याचे दिसुन आले. वाहन चालक १) शेख रेहान शेख रहीम, वय ३२ वर्ष, रा. खंडेलवार केशर जवळ, सरदार चौक, फेजपुर बायपास कुंभारवाडी अमरावती व सोबत २) राहील अहमद फारूक अहमद, वय २५ वर्ष, रा. खंडेलवार केशर जवळ, सरदार चौक, फेजदरपुरा बायपास, कुंभारवाडा, अमरावती असे आरोपी मिळुन आले पोलीसांनी पंचासमक्ष १) १६ चक्का एल पी ट्रक क. एम एच २७ डी.एम. ५२७९ किमंती ३०,००,०००/- रूपये आणि ११ ब्रास रेती किमती ५५,०००/- रूपये असा एकुण ३०,५५,००००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीतांविरूध्द पोस्टे उमरेड येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं. सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल संहीता, कलम ४. २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ (अ) सार्वजनिक मालत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४, सहकलम १५ पर्यावरण सरंक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular Articles