– नागपूर महानगरपालिका श्री २०२५ शरीर सौष्ठव स्पर्धेला उदंड प्रतिसाद
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
नागपूर :- नागपूर महानगरपालिका व बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोशिएशन विदर्भ, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या नागपूर महानगरपालिका श्री २०२५ शरीर सौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत ‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयनचा किताब नागपूरच्या निलेश जोगी यांनी तर बेस्ट पोजर म्हणून चंद्रपूर येथील आकाश डडमल यांनी पारितोषिक पटकाविले. सर्व विजेतांना एकूण ४ लाख २४ हजार रुपयांची परितोषिक प्रदान करण्यात आले.
लकडगंज भागातील सरदार वल्लभभाई पटेल(कच्छी विसा मैदान) मैदानावर ही स्पर्धा पार पडली. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, बॉडी बिल्डर संघटनेचे अध्यक्ष संग्राम गावंडे, सरचिटणीस अभिषेक करींगवार, कोषाध्यक्ष दिनेश चावरे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची बरीच गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या स्पर्धेत कुणाला ‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन’ मान मिळणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. या स्पर्धेत विदर्भातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
दोन्ही विजेत्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे इतर विजेत्यांना सुद्धा रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.

ही स्पर्धा सहा गटामध्ये घेण्यात आली. चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन ठरलेले निलेश जोगी यांनी 80 किलोग्राम वजनापेक्षा अधिक वजनाच्या गटातही अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. तर आकाश डडमल यांनी 75 किलोग्राम वजन गटात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
प्रत्येक गटातील पाच विजेत्यांची नावे
60 किलोग्राम वजन गटामधील विजेत्यांची नावे
1. प्रवीण बुधे – वाशिम
2. राहुल बागडे – नागपूर
3. भावेश राज – अमरावती
4. शेख तौफीक – चंद्रपूर
5.निखिल उईके – अकोला
65 किलोग्राम गटामधील विजेत्यांची नावे
1. गिरीराज काळे – नागपूर
2. प्रवीण घोरमोडे – अमरावती
3. मोहित गारगे – चंद्रपूर
4. प्रज्वल उरकांडे – वर्धा
5.करण दरवाडे – नागपूर
70 किलोग्राम वजन गटातील विजेते
1. हरीसिंग कुशवाह – नागपूर
2. विक्रांत गोडबोले – नागपूर
3. शेख सलिम शेख कलीम – अकोला
4. अजय इंगळे – अमरावती
5. प्रितम साह – नागपूर
75 किलोग्राम वजन गटातील विजेते
1. आकाश डडमल – चंद्रपूर
2. अ. फारूख अ. नासिर – वाशिम
3. श्रावण बावणे – नागपूर
4. विनय खोरगडे – नागपूर
5. गौरव भगत – अमरावती
80 किलोग्राम वजन गटातील विजेते
1. योगेश शेंडे – नागपूर
2. साहिल धनावत – नागपूर
3. मो. तनवीर मो. हयात – बुलढाणा
4. सुमीन मेटकर – वाशिम
5. प्रणाल लांजेवार – नागपूर
80 किलोग्राम पेक्षा अधिक (खुल्या) वजन गटातील विजेते
1. निलेश जोगी – नागपूर
2. स्वराज गोधनकर – अमरावती
3. अक्षय प्रजापती – नागपूर
4. अभिजीत घाटोळे – अकोला
5. लोकेश गुप्ता – नागपूर




