spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मतदार यादीत नाव नाही; वयोवृद्ध दांपत्याची मतदानासाठी धावपळ

नागपूर :- तब्बल पावणेचार वर्षांनंतर नागपूर महापालिकेची निवडणूक आज होत आहे. आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत ३८ प्रभाग असून १५१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महापालिकेने शहराचे दहा झोनमध्ये विभाजन केले आहे. त्यानुसार धंतोली झोनमध्ये प्रभाग क्रमांक १७, ३३ आणि ३५ यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक ३५ मधील मनीष नगर येथील रचना किड्झी शाळेतील मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने चिडचिड व्यक्त केली जात होती. दोन वयोवृद्ध दांपत्याने या मतदान केंद्रावर वेगवेगळ्या पक्षांच्या बूथवर चौकशी केली; मात्र त्यांची नावे सापडली नाहीत.

प्रभाकर गायकवाड (रेणुका नगर, मनीष नगर) यांनी सांगितले की त्यांचे नाव दरवेळी रचना किड्झी शाळेतील मतदान केंद्रावर असायचे; मात्र यावेळी त्यांचे नाव यादीत नाही. त्यांच्या दोन मुलांची व दोन सुनांची नावे नरेंद्र नगर येथील अग्निशमन केंद्राजवळील मतदान केंद्रावर गेली आहेत. मात्र त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव कोणत्याच मतदार यादीत आढळत नाही.

त्यामुळे ते सकाळी साडेसात वाजल्यापासून विविध मतदान केंद्रांवर जाऊन चौकशी करीत आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.