spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संपन्न

नागपूर :- 1 नोव्हेंबर रोजी हॉटेल अतिथी इन मानेवाडा रोड नागपूर येथे राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणेश्वरराव आरीकर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघ, उद्घाटक शाहुजी भोयर राष्ट्रीय संघटक,प्रमुख अतिथी श्याम लेडे राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रा शेषराव येलेकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष,बाबाराव भोयर राष्ट्रीय कोषाध्यक्ष, शिवशंकर मुंगाटे राष्ट्रीय सचिव, विनोद चौधरी राष्ट्रीय सल्लागार, यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जगद्गुरु तुकोबाराय व 19 थोर एकत्र असलेल्या थोर पुरुषांच्या प्रतिमेच पूजन व मलार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम लेडे यांनी करून समाजाबद्दल व सद्याच्या घडामोडीबद्दल व राष्ट्रीय खैर कुणबी महासंघाची गरज काय आहेत याची विस्तृत माहिती दिली. गुणेश्वर आरीकर यांनी सुद्धा पूर्वीपासून करीत असलेल्या खैरे कुणबी समाज कार्याबद्दल माहिती दिली. तसेच नविन संघटना निर्माण करण्याचा उद्देश सांगितला व यापुढेही मी सतत समाजकार्य करत राहील असे अभिवचन दिले. यानंतर ज्यांनी 15,20 वर्षापासून समाज कार्य केले अशा खालीलप्रमाणे बंधू भगिनींना शाल श्रीफळ देऊन नथ्थूजी पाल, भैयाजी रडके, नंदा फुकट,अरूणा फाले, सुरेखा रडके, राणी ठाकरे, वैशाली भुजाडे, वर्षा शेंडे, माधुरी आरीकर, उषा देशमुख, कल्पना रडके, याचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर संघटना विस्ताराकरीता राष्ट्रीय खैरे कुणबी महिला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी रत्नमाला भोयर, राष्ट्रीय खैरे कुणबी युवा महिला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी प्रणाली रोहाड, राष्ट्रीय खैरे कुणबी युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी समीर भोयर व सर्व विंगच्या एकूण 50 पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करून त्यांना सन्मा गुणेश्वरराव आरीकर व इतर मान्यवरांचे हस्ते निवड पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर शेषराव येलेकर यांनी नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे वाटचाली विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात 72 समाजबांधवाचा सहभाग होता.

आभार प्रदर्शन बाबाराव भोयर यांनी केले.शेवटी राष्ट्रगीत व स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular Articles