spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भालेराव महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन संपन्न

सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची जयंती दरवर्षी १२ ऑगस्ट राष्ट्रीय ग्रंथपालदिन म्हणून देशात दरवर्षी साजरी करतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील डोंगरे तर प्रमुख अतिथी आणि वक्ते शुभम मासुरकर होते. मासुरकर यांनी आपल्या सादरीकरणातून आधुनिक ग्रंथालयाचे स्वरूप, ग्रंथालयातील उपलब्ध माहिती संसाधने, ई-ग्रंथालय, डिजिटल संसाधने, संदर्भसाहित्य तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास व संशोधनासाठी माहितीचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सविस्तर विवेचन केले. त्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी आणि ग्रंथालयातील उपलब्ध साधनसंपत्तीचा शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुनील डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीचे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन सुरेश बंड, प्रभारी ग्रंथपाल यांनी केले. प्रसंगाचे औचित्य साधून पलक मानकर या विद्यार्थिनीने ‘वाच रे पोरा’ ही प्रा. विलास डोईफोडे रचित कविता सादर केली. यावेळी आय. क्यू. ऐ. सी. समन्वयक डॉ. प्रशांत डबरासे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदिनी ढोले, आभारप्रदर्शन समीक्षा ठाकरे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुहास व्यवहारे, प्रा. चंद्रशेखर पोटोडे, विलास सोहागपुरे, हेमंत पोहकार, सुरेश मेंढे, लक्ष्मी मरस्कोल्हे, नेहा ठाकरे, वैष्णवी लोही, संस्कृती ऋषींया आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Popular Articles