spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धरमपेठ महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर :- धरमपेठ शिक्षण संस्थेच्या धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे दि. ३१ जुलै व १ ऑगस्ट २०२६ रोजी “आर्टिफिसिअल इंटेलिजन्स फॉर टीचिंग –लर्निंग” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. उल्हास औरंगाबादकर, सचिव सुरेश देव, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. पितांबर हुमणे, संयोजक कॅप्टन डॉ. प्रशांत आंबेकर, सहसंयोजक डॉ. नितीन गायकवाड तसेच आयोजन सचिव रुमा कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यशाळेसाठी सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे येथील डॉ. कृष्ण कांता रॉय तसेच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, नवी दिल्ली येथील प्रा. के. श्रीनिवास, प्रमुख, आय. सी. टी. व प्रकल्प व्यवस्थापन विभाग यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

उच्च शिक्षणातील शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक साक्षरता विकसित करणे तसेच अध्यापन, संशोधन, शैक्षणिक प्रशासन आणि संस्थात्मक गुणवत्ता वृद्धीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेतील हँड्स-ऑन प्रशिक्षण सत्रांना सहभागी प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा प्रत्यक्ष वापर, अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती, संशोधन, शैक्षणिक लेखन, आशय निर्मिती, प्रशासन तसेच जबाबदार आणि नैतिक पद्धतीने ऐ. आय. चा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

याच प्रसंगी महाविद्यालयातर्फे शिक्षकांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या “आर्टिफिसिअल इंटेलिजन्स फॉर टीचिंग –लर्निंग : टूल्स , टेकनि्कस अँड बेस्ट प्रॅक्टिसेस ” या सर्वसमावेशक कार्यशाळा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत विज्ञान, कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच विविध शाखांतील उच्च शिक्षण संस्थांमधील ११० हून अधिक प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी प्राध्यापकांनी कार्यशाळेची उच्च शैक्षणिक गुणवत्ता, व्यावहारिक स्वरूप आणि आधुनिक उच्च शिक्षणासाठी असलेली उपयुक्तता याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यापन, अध्ययन, संशोधन, नवोपक्रम आणि उत्पादकता वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याचा आत्मविश्वास या कार्यशाळेमुळे प्राप्त झाल्याचे त्यांनी अभिप्रायात नमूद केले.

विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा जोशी, सीमा पाटेकर व आभा खेडीकर यांनी केले. आभार प्रा. पितांबर हुमणे यांनी मानले.

Popular Articles