हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या क्रीडा विभाग, एनएनएस विभाग, आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क, भंडारा आणि मेरा युवा भारत, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारीला आठवले महाविद्यालयाच्या दिवंगत डॉ. चंदन सिंह रोटेले सभागृहात राष्ट्रीय युवा दिन, साजरा करण्यात आला.
सोबतच स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद आणि शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली देऊन झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यवाहक प्राचार्य डॉ. नरेश कोलते यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून भंडारा येथील सनफ्लॅगचे माजी सहाय्यक व्यवस्थापक के.सी. वर्मा उपस्थित होते.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी सुशील भड उपस्थित होते. प्राचार्य, प्रियदर्शिनी अध्यापक विद्यालय डॉ. आम्रपाली भिवगडे, अमोलसिंग रोटेले. व्यवस्थापन समिती सदस्यः डॉ. इलियास बोपारी, एनएनएस विभागाचे प्रमुख डॉ. देवेंद्र सोनटक्के, नॅक विभागाचे प्रमुख, डॉ. नंदकिशोर भगत, क्रिमिनोलॉजी विभागाचे प्रमुख आणि सत्यवचन बी के वाहिनीचे संचालक बाळकृष्ण तुरणकर, तसेच डॉ. मधुकर निकम, प्रा. सुनील उईके, डॉ. सुरेखा पाटील, प्रा. शिवकुमार बावनकुळे उपस्थित होते. तसेच ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंदू पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रमुख वक्ते के. सी. वर्मा आणि एमएसडब्ल्यूची विद्यार्थिनी पूजा चोपकर यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. नरेश कोलते यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील भड, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, भंडारा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नंदकिशोर भगत यांनी केले, तर डॉ. आय. जी. बेपारी यांनी आभार मानले.




