spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बिग बॉस 19 आणि मास्टर शेफ विजेता गौरव खन्ना यांच्या हस्ते नवेद आझमी यांचा सन्मान

– ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा (ओआय) या आजाराने ग्रस्त नवेद आझमी नागपुरात कमावत आहे नाव

नागपूर :- 12 मे रोजी नागपूर येथील हॉटेल रेजेन्टा येथे एसजेएम इव्हेंट ऑर्गनायझर यांच्या वतीने भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मॉडेल्स, डिझायनर्स, मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर्स, मीडिया रिपोर्टर्स आणि स्पॉन्सर्स यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा अभिनेता गौरव खन्ना यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याच पुरस्कार सोहळ्यात नवेद आझमी यांना उत्कृष्ट मीडिया चॅनल संचालनासाठी सन्मानित करण्यात आले. सिवनी येथील रहिवासी असलेले नवेद आझमी आज नागपूरमध्ये आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

नवेद आझमी हे ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा (ओआय) या दुर्मिळ आनुवंशिक आजाराने पीडित आहेत. या आजारामध्ये शरीरातील हाडे अत्यंत कमजोर होतात आणि किरकोळ दुखापतीमुळेही फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत नवेद आझमी सातत्याने मीडिया क्षेत्रात सक्रिय असून समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

गौरव खन्ना हे भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्यांनी रिअलिटी शो सेलिब्रिटी मास्टर शेफ चे विजेतेपद पटकावून मोठी प्रसिद्धी मिळवली होती.

नवेद 2018 पासून नागपूरमध्ये वास्तव्यास आहेत. अल्पावधीतच त्यांनी नागपूरमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ते पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.