spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जय शितला माता मंदीरात नवरात्रोत्सवाची सुरूवात

कन्हान :- चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सवा निमित्य जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे विधीवत पुजा अर्चना, ़आरती करून प्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रोत्सवाची सुरूवात करण्यात आली.

जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे चैत्र नवरात्रो त्सव व गुढीपाडवा उत्सव प्रित्यर्थ पंडित विजय पहुरकर महाराज यांचे उपस्थित लता चंद्रशेखर बावनकुळे माजी ग्राम पंचायत सदस्या परिवारा कडुन विधीवत पूजा पाठ करण्यात आली. आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी रिता भगवान मस्के नगरसेविका नगर पंचायत कांद्री, सरोज राठोड, मेघा कोल्हे, शुक्ला, मरघडे, खैरकर, राऊत, किर्ती हटवार, पांडे दिदी, जिगन्ना पटेल, मोहोड, रमेश पोटभरे, नरेश बावणे, मासुम मेहर, रामचंद्र भाऊ, विनोद आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जय शीतला माता मंदीर कमेटीचे संजय चौकसे, दिलीप मरघडे, वामन देशमुख, महेश मंगतानी, प्रकाश ढोके, वसंत राऊत, ओमदास लाडे, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हाण, नरेश बावणे, अरुण बावनकुळे, नितीन शर्मा, पारस मरघडे, रोशन बोरकर, वंश पटेल, साई राऊत, नरेश रक्षक सह भाविक मंडळी सहकार्य करित आहे.

Popular Articles