– भव्य कावड़-कलश यात्राने ६८ व्या नवरात्रौत्सवाचा भक्तिमय शुभारंभ
– अखंड मनोकामना ज्योतीसह नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
कन्हान :- आदिशक्ति नवदुर्गा मातेच्या जयघोषात, ढोल-ताश्या, बँड-वाजा व भजन मंडळाच्या भक्तिमय सुरात पावन कन्हान नदीचे पवित्र जल भरू पारंपारिक भव्य कावड, कलश यात्रा कन्हान शहराचे भ्रमण करि त पिपरी स्थित प्राचीन दुर्गा माता मंदिरात सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान द्वारे ६८ व्या भव्य नवरात्रौत्सवाचा शुभारंभ करून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात नऊ दिवस, आरती, देवी जस जागरण, देवीचा गोंधळ, महाआरती, हवन, भव्य महा प्रसाद,घट विसर्जन व सायंकाळी रावन दहन असे विविध कार्यक्रमाने नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी व्दारे नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात आला. 

रविवार (दि. ११) ऑक्टोंबर २०२६ ला सार्वज निक दुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हान व्दारे सकाळी १० वाजता पावन कन्हान नदीचे कलशात जल भरून भव्य कलश, कावड यात्रा बीकेसीपी शाळेपासुन कल शधारण कन्या, महिला आणि कावडधारी भक्त रांगेत, नवदुर्गेचे नव स्वरूपाच्या आकर्षक झांक्या, बग्गी, घोड़ों, बैंड-वाजे, भजन मंडळी विशेष आकर्षक होते. ‘जय माता दी’, ‘जय जगदंबे’ च्या गगनभेदी जयघोषा ने सपुर्ण परिसर भक्तिमय झाला. कलश, कावड यात्रा महामार्गाने गांधी चौक, नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन पिपरी मार्गने नगर भ्रमण करित दुर्गा माता मंदिर पिपरी येथे पोहचुन दुर्गा माता मंदिरात कलशातील पवित्र जल, दूध, दही, तुपासह पंचामृताने नवदुर्गा मातेचा अभिषेक करून मंत्रोच्चारात विधिवत पूजा-अर्चना करून घटस्थापना व पारंपारिक पध्दती ने अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करून नवरात्रौ त्सवाची सुरूवात करण्यात आली.
नव दिवस भक्ति, आराधना आणि धार्मिक कार्यक्रमा ची पर्वणी
नवरात्र महोत्सवात दररोज प्रतिदिन सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती, सोम वार (दि.१२) ऑक्टोंबर ला रात्री महाकाली जस जाग रण, बुधवार (दि.१४) ला देवी गोंधळ, शुक्रवार (दि. १६) ला गरबा, रविवार (दि. १८) ला अष्टमी महायज्ञ व हवन पूजन, सोमवार (दि.१९) ऑक्टोंबर ला भव्य महाप्रसाद तथा मंगलवार (दि.२०) ला सकाळी घटविसर्जन व दुपारी रक्तदान आणि सायंकाळी रावण दहना सह विविध धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रौत्सव सार्वजनि क नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे थाटात साजरा करण्यात आला. नऊ दिवस परिसरातील भावि क मंडळीने मोठया संख्येने उपस्थित राहुन नवदुर्गा मातेचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. या महोत्सवात धार्मिक परंपरा, देवीभक्ती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.








