किशोर साहू, मौदा, ता. 22 :- मागील दोन वर्षाप्रमाणे यंदा तिसऱ्या वर्षीही श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा अयोध्या व नववर्षानिमित्त उद्या गुरुवार (दि. 22 जानेवारी) ते शुक्रवार (दि. 30 जानेवारी) पर्यंत निसतखेडा येथील हनुमान मंदिर परिसरात आश्रम वृंदावन येथील प.पू. बालयोगी साक्षी निष्कम्प चेतन गिरी महाराज (दुबे) यांच्या वाणीतून श्रीमद राम कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात करण्यात येणार आहे. 23 जानेवारीला आयोजक श्रीराम कृपा भजन मंडळ द्वारे सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत लोककला राष्ट्रीय शाहीर भजन मंडळ मेळावा. 24 जानेवारीला खाटू श्याम भक्त परिवार तर्फे ऑडिओ व्हिडिओ सिंगर नागपूर येथील गायिका जया पवन आचार्य यांच्या खाटू श्याम भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 26 जानेवारीला ऑडिओ व्हिडिओ सिंगर सिवनी (म प्र) गायिका सुमन वंशकार व हर्षदा यादव यांच्या देवी जागरण कार्यक्रम. 30 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता पासून सप्ताहाचा महाप्रसादाने समारोप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्याम कुमार बर्वे ,राजेंद्र मुळक, मल्लिकार्जुन रेड्डी, टेकचंद सावरकर ,चंद्रपाल चौकसे उदयसिंग यादव, प्रसन्ना तिडके, विकेंद्र महाजन, विशाल बरबटे, रश्मी बर्वे, निशा सावरकर अनुरमा सिंह, अवंतिका लेकुरवाळे ,नंदा लोहबरे, भारती गोडबोले, कामिनी हटवार, प्रज्ञा बावणे, लुंबिनी कलारे, वनिता नोकरकार, चंद्रकला हिंगे ,कैलास बरबटे ,देवेंद्र गोडबोले ,लक्ष्मण उमाळे , खेमराज चाफले ,प्रमोद बरबटे, रोशन मेश्राम ,भूमेश्वर चाफले ,श्रीनू यागंटी, संकेत झाडे ,धनराज हारोडे, उमेश झलके सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या सप्ताहाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.




