Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

विभागीय लोकशाही दिनात एकही नवीन तक्रार नाही

नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात आज एकही तक्रार प्राप्त झाली नसून प्रलंबित एका तक्रारींबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात नव्याने एकही तक्रार प्राप्त झाली नाही. यावेळी महिला व बालविकास, कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यापूर्वीच्या लोकशाही दिनात प्राप्त चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील एका तक्रारीबाबत पवार यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यास यापूर्वी मागविण्यात आलेल्या अहवालाबाबत विचारणा केली. संबंधित अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय लोकशाही दिनात यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजीची चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील एक तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिकेच्या जागेवर अवैध बांधकाम करून अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com