spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

योग सखी बहुउद्देशीय संस्था व योग सखी परिवार द्वारा जागतिक महिला दिन साजरा

नागपुर :- योग सखी बहुउद्देशीय संस्था व योग सखी परिवार तर्फे हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी व होम गार्ड महिलांचा “भारतीय संविधान” देऊन गौरव करण्यात आला. तसेच जेष्ठ महिला याना महानाइकांची प्रतिमा आणि भारताचे संविधान देऊन गौरव करून जागतिक महिला दिन साजरा.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद झालेले फ्लाईट लेफ्टनंट पुर्वेश दुरुगकर ह्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी एस आय मेघा लुटे तर प्रमुख अतिथी पी एस आय शलाका शिरसाट व सारिका मिसार होत्या. योग सखी बहुउद्देशीय संस्था व योग सखी परिवार व्दारे हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी व होम गार्ड महिलांचा “भारतीय संविधान” देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्या महिलांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष करून मुलांची योग्य जडणघडण केली अशा जेष्ठ महिला गौरा कुरुटकर, अनु काळे , सुशीला कडु ह्यांचा महानाइकांची प्रतिमा व भारताचे संविधान देऊन गौरव करण्यात आला. तीन वर्षाच्या चार्वी डहाके हिने सुंदर गीत सादर केले. पीएसआय मेघा लुटे व पीएसआय शलाका शिरसाट ह्यांनी महि लांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सारिका मिसार आपल्या भाषणात म्हणाल्या की किशोर वयीन मुलींचे पळुन जाण्याचे प्रमाण हल्ली प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे त्यांचे शोषण वाढलेले आहे. हा गंभीर चिंतेचा विषय आहे. आईने मुलीची मैत्रीण बनावे. आई – वडिलां सोबतच मुली सुरक्षित आहेत असे सांगितले. कार्यक्र माचे संचालक छाया कुरुटकर ह्यांनी तर आभार छाया वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माधुरी लाडेकर, रेखा कन्नके, चंदा नरड, रचना गांधी, गायत्री बोरकर, श्वेता खाइवले, मेघा फेंडर, दीपाली गजघाटे, वनिता बिरमवार, लता खांबलकर, पल्लवी बालपांडे, ॲड. वृषाली डहाके, प्रज्ञा भगत, शैला तेजसिरी, प्रिया तिरपुडे, सोनु कडु, प्रिया कडु, शुभांगी भागवतकर, विद्या लडके, सोनु खांबलकर, निकिता झिलपे, रूपा झिलपे, ज्योती वानखेडे, किरण तायडे, सारिका भगत, पुष्पा बनकर, सोनाली जवदंड, रिता धुवे आदींनी सहकार्य केले.

Popular Articles