spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे अवैध

चंद्रपूर :- नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी आज (दि. ३१) चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे नामांकन अवैध ठरले.

मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन ५८४ अर्ज अंतिमरित्या स्वीकारण्यात आले होते. यातील ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध तर २२ जणांचे नामांकन अवैध ठरले आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३१ डिसेंबर, २०२५ (बुधवार) सकाळी ११ वाजल्यापासुन करण्यात आली.आता छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०२ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) पर्यंत (सकाळी ११ ते दुपारी ३) या वेळेत असुन निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) रोजी असुन त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

१. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – (प्रभाग क्र. १,२ व ५) – अंतिमरित्या स्वीकारलेल्या ९५ नामनिर्देशन अर्जापैकी अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे – ११

२. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ -(प्रभाग क्र. ३,४ व ६) – अंतिमरित्या स्वीकारलेल्या १०९ नामनिर्देशन अर्जापैकी अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे – ०३

३. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – (प्रभाग क्र. ७,८ व ९) – अंतिमरित्या स्वीकारलेल्या ९६ नामनिर्देशन अर्जापैकी अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे – ००

४. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५) – अंतिमरित्या स्वीकारलेल्या १५७ नामनिर्देशन अर्जापैकी अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे – ०१

५. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – ( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७) -अंतिमरित्या स्वीकारलेल्या १२७ नामनिर्देशन अर्जापैकी अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे – ०७

Popular Articles